चंदगड : चंदगड शहरांत कॉलेज रोड येथे शनिवारी (9 मे 2026) रात्री 9.15 वाजता एका पिसाळलेल्या कुत्र्याने दोन बालकांना व एका तरुणाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. या तिघांच्याही उजव्याच हाताला त्या कुत्र्याने चावा घेतला.आझाद गल्लीतील फारुख (वय 18), झीशान (वय 13) या दोन बालकांसह एक तरुण रोहित ( वय 30) यांच्यावर त्या कुत्र्याने हल्ला करून जखमी केले. ( *सदर कुत्रा काळ्या रंगाचा असून त्याचा पोटाखालील भाग पांढरा आहे
चंदगड शहरातील लहान मुलांच्या पालकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन नगरपंचायतकडून करण्यात आले आहे.तर दुसरीकडे प्रशासनाने तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
सूचना : चंदगड शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की शहरांमध्ये पिसाळलेले कुत्रे आढळून आल्यास नगरपंचायत चंदगड मुकादम महेश कांबळे 9405278845, 9405616193, 9423615131या नंबरवर कॉल करून नगरपंचायत चंदगडशी संपर्क करावे
सुनील काणेकर,
नगराध्यक्ष नगरपंचायत चंदगड

Post a Comment
0 Comments