कोल्हापूर : मुंबई-चंदगड वरून निघणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हल्सचा भोंगळ कारभार पुढं आला आहे.सोमवार दि. 4 मे रोजी निघणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हलच्या एजन्सीने प्रवाशांना तीन तास कोल्हापूर येथे थांबून ठेवले.त्यामुळे प्रवाशांनी पूर्ण नाराजी व्यक्त करत या ट्रॅव्हल्स एजन्सीवर कारवाई करावी व परवाना निलंबित करावा अशी मागणी केली आहे.
याविषयीं अधिक माहिती अशी कि,इंदुमती ट्रॅव्हल्सचे एक वाहन तांत्रिकदृष्ट्या रात्रीच्या सुमारास बंद पडले त्यामुळे त्यातील प्रवाशी हालवण्यासाठी एजन्सीने पुढं गेलेल्या गाडीला तब्बल तीन तास थांबून प्रवाशांची गैरसोय केलीय.प्रवाशांची या तीन तासात धांदल उडाली.काही प्रवाशी गाडी पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार करण्यास आग्रही होते.या भोंगळ कारभारामुळे या प्रवाशांनी पून्हा या सेवेला पूर्णविराम देत या एजन्सीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे अशा बेजबाबदार ट्रॅव्हल एजन्सीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एकीकडे वाढीव दर, वेळेची गैरसोय, मॅनेजमेटचा निष्काळजीपणा व गाडीतील वाहक चालक यांचे बेजबाबदार वर्तन यामुळे वर्षानुवर्षे लोकांचा गैरसोय होत असून जाहिरातबाजी करून प्रवाशांना फसवणाऱ्या अशा एजन्सीचे परवाने निलंबित करावेत.एकीकडे ऑनलाईन सुविधा घेत वाढीव पैसे आकारता आणि सेवा देताना प्रवाशांना मानसिक त्रास देत त्यांची गैरसोय करता मग ट्रॅव्हल्स एजन्सी कशासाठी केलीय? अशा प्रश्न लोकांकडून केला जात असून नाराजीचा सुरु प्रवाशांकडून पाहायला मिळाला.

Post a Comment
0 Comments