Type Here to Get Search Results !

म्हाळेवाडीत “शिवाजी कोण होता” या पुस्तकाचे मोफत वाटप

 


चंदगड/प्रतिनिधी : म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील गावामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या ऐतिहासिक व प्रेरणादायी पुस्तकाचे मोफत वाटप अभिजीत कांबळे यांच्याद्वारें करण्यात आले.या उपक्रमामागचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हा होता. महाराष्ट्र राज्य दिन, बौध्द जयंती, कामगार दिन तसेच सरपंच सी ए पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


यावेळी अभिजीत कांबळे म्हणाले, शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेतील योगदान, शौर्य व नेतृत्वगुण याविषयी मार्गदर्शन केले. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये इतिहासाची आवड निर्माण होऊन राष्ट्रभक्तीची भावना दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला तसेच हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.


यावेळी सरपंच सी ए पाटील, उपसरपंच विजय मर्णहोळकर, पी एस कांबळे, डी एस कांबळे, मुख्याध्यापक एम आय कांबळे, निगांप्पा दळवी, बाळकृष्ण गणाचारी, विजय गावडे, नारायण गडकरी, व्ही एन नाईक, अंगणवाडी सेविका शोभा पाटील, आनंदी कांबळे, माधवी कांबळे ग्रा.प.सदस्या अमृता कांबळे, रमेश पाटील दिलीप पाटील व गावातील नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments