Type Here to Get Search Results !

महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी डॉ.संतोष जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील श्री दातांचा दवाखाना येथे उपचारासाठी आलेल्या महिलेच्या तक्रारीवरून डॉ. संतोष जाधव यांच्याविरुद्ध चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, चंदगड यांच्या आदेशानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ व ७५(१)(i)(२) अन्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला.


तक्रारीनुसार, ३ जून ते ६ जून २०२६ या कालावधीत चंदगड येथील श्री दातांचा दवाखाना येथे उपचारासाठी गेलेल्या फिर्यादी महिलेसोबत आरोपी डॉक्टरांनी गैरवर्तन करून तिची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. ८९५ कांबळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments