Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न!


कोल्हापूर | प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन बैठक व्ही.सी रूम मुख्यालय जिल्हा परिषद कोल्हापूर येथे पार पडली.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती पुढं येत आहे.त्यामुळे याविषयीं तात्काळ आढावा बैठक घेण्यात आली.त्यांचप्रकारे या आपत्ती व्यवस्थापन संदर्भात सर्व ठिकाणी सूचना व्ही सी वरून प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या.


यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पाताई खोत, उपाध्यक्ष तानाजीराव पाटील,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.ज्यास्मिन,बांधकाम सभापती सारिका नांदेकर, शिक्षण सभापती शितलताई यादव, जि प सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.याचबरोबर जिल्हा परिषद मध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला. व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा नंबर सर्व सदस्यांना देण्याच्या सूचना जि.प. अध्यक्ष शिल्पाताई खोत यांनी केल्या.

Post a Comment

0 Comments