सदर समस्या ग्रामपंचायतीने तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.याबद्दल सरपंच पती सुभाष सावंत यांना विचारले असता गावातील सध्या जॅकवेलवरील मोटार जास्त पाणी ओढत नाही त्यामुळे नवीन मोटर बसविणार असल्याचे सांगितले.तसेच गल्लीत चिखल झालेल्या ठिकाणी खडी टाकायची आहे.मात्र ग्रामसेवक यांना वेळ नाही असे सांगण्यात येत आहे.ग्रामपंचायतीने या सर्व समस्या कोणतीही कारणे न सांगता तात्काळ मार्गी लावाव्यात अन्यथा ग्रामपंचायतीवर भर पावसात मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात बी.डी. ओ. व सी. इ. ओ.तसेच आमदार शिवाजीराव पाटील यांनी लक्ष घालून ग्रामस्थांच्या समस्या मार्गी लावाव्यात.
त्यांचप्रकारे ग्रामपंचायतीने मुलांना इ लर्निंग साठी पुढील आराखड्याची वाट न पाहता तात्काळ नवीन संच द्यावा.या संदर्भातील मागणी शाळा व्यवस्थापन कमिटीने ग्रामपंचायतीकडे केली आहे.तसेच प्राथमिक शाळेच्या मागे असणारे झाड धोकादायक बनले असून सदर झाडापासून शाळेची सुटका करावी अशीही मागणी पालकांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. एकंदरीत या सर्वांची दखल तात्काळ घ्यावी व वरील समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Post a Comment
0 Comments