आजरा प्रतिनिधी | पुंडलिक सुतार : गडहिंग्लज-चंदगड रस्त्याच्या रुंदीकरणावेळी बटकणंगले येथील बस स्थानक पाडण्यात आले असून आता सदर रस्ता तयार झाला आहे मात्र अजूनही या ठिकाणी बस स्थानक बांधण्यात आले नाही.त्यामुळे सध्या जोराच्या पावसात प्रवाशांना स्थानकाच्या बाजूला असणाऱ्या घरांचा आसरा घ्यावा लागत आहे.त्यामुळे तात्काळ संबंधित विभागाने येथे बस स्थानक बांधावे अशी मागणी नऊ गावातील प्रवाशातून होत आहे.
या भागातील ग्रामपंचायतीच्या विनंतीनुसार गडहिंग्लज व चंदगड आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी हंदेवाडी कोळींद्रे फाट्यावर बस थांबविणे सुरू केले होते.मात्र तक्रारीनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी जुन्या बस स्थानकवर बस थांबविणे सुरू केले आहे. 9 गावांच्या ग्रामस्थांचा विचार घेऊन बटकनंगले येथे योग्य ठिकाणी मोठे बस स्थानक सर्व सुविधांसह बांधावे व प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे .

Post a Comment
0 Comments