Type Here to Get Search Results !

अडकूर-नेसरी भागात गोवा बनावट दारुसाठा जप्त!

 


राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह 10.53 लाखांचा मुद्देमाल जप्त


गडहिंग्लज प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज कार्यालयाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने नेण्यात येणाऱ्या वाहनावर धाड टाकून एकूण 10 लाख 53 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 25 बॉक्स आणि एक चारचाकी टाटा सुमो गोल्ड वाहन ताब्यात घेण्यात आले. 


राज्य उत्पादन शुल्क विभागाला अडकूर-नेसरी मार्गावरून अवैध मद्यवाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर बोंजुर्डी बसथांब्याजवळ सापळा रचण्यात आला. संशयित टाटा सुमो (क्र. GA-07-E-5520) थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 25 बॉक्स आढळून आले. जप्त मद्याची किंमत 2 लाख 53 हजार 440 रुपये, तर वाहनाची अंदाजे किंमत 8 लाख रुपये असून एकूण 10 लाख 53 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालक अमोल नंदकुमार सावंत याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 




ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चव्हाण, अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. सी. केरीपाळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments