कोल्हापूर | प्रतिनिधी : शाळेच्या दाखल्यावरील धर्म आणि जात हे कॉलम हटवल्याशिवाय समान नागरी कायदा आणू नये, अशी मागणी ब्लॅक पँथर पक्षाने मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.यावेळी निवेदन देताना विविध पदाधिकारी उपस्थित होते.
भारतात अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. या देशात साधारणत: ६.७४३ जातीचे लोक आहेत. हिंदू धर्मामध्ये जाती, पोटजाती तशाच मुस्लिम, खिश्चन,शिखांमध्येही वेगवेगळे पंथ असल्याने त्यांच्यात अंतर्गत रोटी बेटी व्यवहार आजही केले जात नाहीत. भारतात आजही गरीब श्रीमंतांमध्ये समानतेची दरी फार मोठी आहे.त्यामळे जमीन व संपत्तीचे समान वाटप केल्याशिवाय समान नागरी कायदा आणू नये, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी बाजी गोंधली,प्रिया कांबळे,प्रवीण निगवेकर, दयानद कांबळे, सुभाष देसाई उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments