चंदगड : महादेवराव बी.एड. कॉलेज, तुर्केवाडी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींनी दोन्ही महान व्यक्तींना अभिवादन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महादेवराव वांद्रे उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये बी.एड. विभागप्रमुख प्रा. ग. गो. प्रधान यांनी दोन्ही महान व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेतला. तर प्रा. एन. जे. कांबळे यांनी प्रत्यक्ष कार्याचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एस. जी. खाडे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दोन्ही महान विभूतींच्या विचारांचा प्रेरणादायी संदेश दिला.आणाभाऊ साठे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन पुढील जीवनात चांगले विचार रुजविण्याचा प्रयत्न करावा, तसेच देशनिर्मितीसाठी केलेल्या कार्याची माहिती घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रशिक्षणार्थी मनोगतामध्ये सायली वी. पाटील, मेघा कांबळे,गजानन कार्वेकर, विराज कार्वेकर,सायली स. पाटील,सौरभ चिंचणगी व गुंडू नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक ममता राजगोळकर यांनी केले.सूत्रसंचालन शीतल शिवाजी पाटील यांनी केले.आभार भक्ती पाटील यांनी मानले.


Post a Comment
0 Comments