गर्भलिंग तपासणी, बेकायदेशीर गर्भपात आणि बोगस डॉक्टरांचे रॅकेट उघड!
कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करणाऱ्या एस.पी. गँगवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात MCOCA अंतर्गत राज्यातील पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. करवीर पोलिसांनी ११ आरोपींविरोधात ही कठोर कारवाई केलीये. गर्भलिंग तपासणी, गर्भपात तसेच बोगस डॉक्टरांच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यवसाय केल्याचे तपासात समोर आले आहे.
मागील दहा वर्षांत करवीर, जुना राजवाडा, राधानगरी आणि भुदरगड पोलीस ठाण्यांत गर्भलिंग तपासणी, गर्भपात आणि बोगस डॉक्टरांविरोधात ११ गुन्हे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर करवीर पोलिसांनी MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रस्तावाची छाननी करून विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला. मंजुरीनंतर टोळीविरुद्ध MCOCA अंतर्गत कारवाईचे आदेश काढण्यात आले.कारवाईमुळे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मोक्का कारवाईतील आरोपींची नावे खालीलप्रमाणे :
स्वप्निल केरबा पाटील, वय ३५, रा. बालिंगा, ता. करवीर, टोळीप्रमुख
महेश सुबराव पाटील, वय ३५, रा. रिससे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर
श्रीमंत तानाजी पाटील, वय ३७, रा. पारिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर
विजय लक्ष्मण कोळसकर, वय ३९, रा. मडिलगे खुर्द, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
प्रशांत वसंत जाधव, रा.वैभवनगर, जि. बेळगाव, कर्नाटक
दत्तात्रय कृष्णात पाटील, रा. रिससे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर
ओंकार गोरखनाथ कराळे, वय ३, रा. सडोळी खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर
सुनील प्रकाश पाटील, वय ३८, रा. रिससे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर
अनिल प्रकाश टिपुगडे, वय ४०, रा. भोगावती साखर कारखाना कॉलनी, भोगावती, ता. करवीर, जि. कोल्हापूर
शिवप्रसाद सत्ताप्पा महादेव पाटील, वय ४०, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर
अश्विनी गजानन शिंदे, वय ३२, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

Post a Comment
0 Comments