चंदगड : चंदगड तालुक्यासह बेळगाव, कोल्हापूर, गोवा भागातील अनेक धनदांडगे लोक कमी रक्कमेत जागा हडप करण्यासाठी सरसावलेले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारी पड जमिनी ताब्यात घेण्याच्या नव्या नव्या क्लृप्त्यांचा अवलंब होतं आहे. असाच प्रकार मळवीवाडी येथे घडून आला.
मळवीवाडी येथील गट क्रमांक २३० ही सरकारी मालकीची जमीन असल्याचे माहीत असतानाही एकाने अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर केल्याचा आणी जिल्हाधिकारी कार्यालयाचा बनावट शिक्का वापरून खोटा आदेश तयार करत ती जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे करण्यात आल्याची तक्रार नायब तहसीलदार किल्लेदार यांनी केली.व त्यानंतर एकावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.पण तरीही यातून पोलीसयंत्रणा मात्र अलर्ट मोडवर असताना पाहायला मिळतंय. कोट्यावधीची जमीन विक्री होतं असताना वर्ग २ ची जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतरित करून मग विक्री झाल्याने यांत अनेक शंकाना वाव मिळतोय त्यामुळे या प्रकरणात अनेक व्यक्तीचा सहभाग असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतं आहे.
सध्या,जमीन अभिलेखांची सुरक्षितता आणी महसूल यंत्रणेच्या कार्यपध्दतीवरच प्रश्नचिन्ह होतं आहे.चंदगड तालुक्यात स्टॅम्पवेंडर,बनावट डिजिटल कागदपत्रे करणारे एजंट व कमिशन खाणारे अधिकारी, कर्मचारी यांची साखळी वाढत आहे.एकंदरीत मळवीवाडी येथील जमीन प्रकरणात अजून काही धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.या प्रकरणात बेजबाबदार असणारे स्टॅम्पवेंडर, मध्यस्थी करणारे एजंट, चुकीची कागदपत्रे करणारें हस्तक व यांना पाठीशी घालणारी सरकारी यंत्रणा तसेच जमीन विक्री घेणारे दलाल हेही तितकेच जबाबदार असल्याने कसून चौकशी केल्यास सर्व संशयित आरोपी सापडण्यास मदत होईल यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ स्वतंत्र पोलीस पथक करून चौकशी करावी अशी मागणी होतं आहे.


Post a Comment
0 Comments