कुद्रेमानी ( प्रतिनिधी ) दि 27 : श्रावणमासाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून कुद्रेमानी काँग्रेस कमिटीच्या वतीने वैजनाथ मंदिर येथे गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा आणि गावातील बंधुभाव वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमास २५० हून अधिक भाविक भक्तांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत महाप्रसादाचा भक्तिभावाने लाभ घेतला.श्रावणातील पवित्र वातावरण, मंदिरातील भक्तीमय गजर आणि भाविकांची लगबग यामुळे वैजनाथ मंदिर परिसराला जणू भक्तीचे स्वरूप प्राप्त झाले होते. *हनुमान हरिपाठ महिला मंडळाच्या वतीने हरिपाठाचे सादरीकरण करण्यात आले*. हरिपाठाच्या मंगलमय स्वरांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी कुद्रेमानी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण देवण, दीपक पाटील, विनायक पाटील, रुक्माणा कागणकर, शंकर पाटील* यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
महाप्रसादासाठी ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी कृष्णा राजगोळकर , मारुती गोवेकर ,रवी पाटील, बाळाराम कदम, सुरेश पाटील, धोंडिबा पाटील, शिवाजी गुरव, नाना पाटील, बबन गुरव , हभप रामचंद्र रवळू पाटील ,शांताराम गुरव, राजू मराठे ,भरमाणा लोहार परशराम काकतकर, शंकर गो. पाटील, संभाजी निंगाप्पा पाटील , शामजी पाटील , बाळाराम गंगाजी पाटील, लक्ष्मण बडकू गुरव, रामलिंग पाटील ,लक्ष्मण राजगोळकर, नारायण गंगाजी पाटील ,रवळू देवण, परशराम तुर्केवाडीकर, रामलिंग पाटील, शशिकांत पाटील, निळकंठ साखरे, राजेंद्र निंगाप्पा पाटील, हणमंत पन्हाळकर, विमल साखर, रेखा गावडू पाटील, वैजू पन्हाळकर, मलाप्पा केसरकर, बाबू शंकर पाटील , पुंडलिक गुंडू पाटील ,संदिप राजगोळकर, मारुती मुरकुटे, शिवाजी पाऊसकर, निलेश संभाजी पाटील, निलेश शंकर पाटील, रोहन पाटील, रसुल मुल्ला ,विठ्ठल रामू पाटील, संजय देवण जयवंत पाटील, जनार्दन लोहार, गावडू पन्हाळकर, मारुती काकतकर, गुरुनाथ देवण, प्रकाश गुंडू बिजगर्णीकर, हुवाप्पा पाटील, वामन कदम, जोतिबा धामणेकर , गोविंद कांबळे, लक्काप्पा कांबळे , सुरेश राजगोळकर, लक्ष्मण कांबळे, वामन कांबळे , यल्लापा नाईक, गोविंद तरवाळ, लक्ष्मण तरवाळ, वैजू गोपाळ तरवाळ, ईश्वर नाईक , सन्नाप्पा नाईक , यांच्यासह असंख्य ग्रामस्थ सहभागी झाले.
महाप्रसादासाठी स्वादिष्ट व सुग्रास भोजन तयार करण्याची जबाबदारी रमेश देवण, काशिनाथ देवण ,शिवाजी राजगोळकर,मारुती रेडेकर ,तुकाराम पाटील आणि परशराम कांबळे यांनी सांभाळली.त्यांच्या परिश्रमातून तयार झालेल्या भोजनाचा भाविकांनी मनमुराद आस्वाद घेतला.श्रावणमासातील या धार्मिक उपक्रमामुळे भक्तीबरोबरच सामाजिक सलोखा, सामुदायिक सहभाग आणि ग्रामएकतेचे दर्शन घडले. विविध स्तरांतील ग्रामस्थांनी व भाविकांनी एकत्र येत महाप्रसादाचा लाभ घेतल्याने गावातील बंधुभाव अधिक दृढ झाला.श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम घडविणाऱ्या या श्रावण महाप्रसादाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

Post a Comment
0 Comments