आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : हंदेवाडी तालुका आजरा येथील गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता.या मुख्य गल्लीतून ग्रामस्थांना ये जा करणे त्रासदायक झाले होते.ही बाब ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून गल्लीमध्ये खडी टाकून लोकांची चिखलापासून सुटका करावी यासाठी पत्रकार पुंडलिक सुतार यांनी ग्रामपंचायत कडे महिनाभर पाठपुरावा केला. याची दखल घेत नुकत्याच झालेल्या मासिक सभेत ही खडीची व पाण्याची समस्या पुन्हा मांडली.त्यातच स्वराज्य युवा मंडळ चा वतीने ग्रामसेवक किशोर पाटील व सरपंच सौ.वंदना सावंत याना निवेदन दिले.
यावेळी सदस्य सदाशिव हेबाळकर,नंदा जाधव व सर्व सदस्यांनी लवकरात लवकर काम करण्याचे आश्वासन दिले होते.पत्रकार पुंडलिक सुतार,शंकर कातकर यांचा पाठपुरावा व स्वराज्य युवा मंडळाच्या निवेदनाची दखल घेऊन ग्रामपंचायत ने अखेर खडी टाकून लोकांची चिखलातून सुटका केली.तसेच पाण्याचा पण प्रश्न तत्काळ सोडविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मासिक सभेला पत्रकार पुंडलिक सुतार, मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य फडके, उपाध्यक्ष अमर मटकर, खजिनदार गिरीश रेडेकर, सचिव रोहन भालेकर, कार्याध्यक्ष प्रतीक जाधव त्याच बरोबर ग्रामस्थ दिनकर कांबळे उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments