चंदगड : जंगमहट्टी येथील महाविद्यालयीन तरुण हर्षद हुंदळेकर याच्या खूनप्रकरणी अटक असलेल्या पाचजणांपैकी चौघांना आणखी दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली.गुरुवारी चंदगड प्रथम वर्ग न्यायालयाने शनिवार, दि.१२ पर्यत या चौघांना पोलिस कोठडी दिलीय.या गुन्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली चारचाकी बेळगाव येथील खासबाग रोडवरील एका गॅरैजमधून रविवारी जप्त केली.या वाहनाचा चालक व आरोपी निवृत्ती नागोजी शिंगाळे (वय २७, रा.नगरगाव-बांद्राईवाडा, ता. चंदगड) हा पाचवा अटक झालला आरोपी आहे. अनेक पुरावे जमा करण्यासाठी बेळगाव सीमाभागात अद्यापही या खून प्रकरणाचा तपास सुरू आहे
त्यामुळे चंदगड पोलिसांच्या विनंतीनुसार न्यायालयाने 'वाहन चालकासह कीर्तीकुमार रामू कुट्रे (वय २८) आणि दिलीप लक्ष्मण कुट्रे (३०) या दोघा चुलत बंधूसह त्यांचा मित्र श्रीनाथ नागु्डेकर (३0, तिघेही रा. जंगमहट्टी अशा चौघाजणांना पोलिस कोठडी मिळाली आहे. तर खुनाच्या कटासाठी हर्षदला मैत्रीच्या जाळ्यात ओढून अज्ञात स्थळी बोलावून घेण्यात मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली संशयित आरोपीची मैत्रीण उषा परशराम नाईक (रा. जंगमहट्टी फाटा, ता. चंदगड) हिची पोलिस कोठडी संपल्याने तिची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.
एकंदरीत या प्रकरणात अजून काही धागेदोरे सापडण्याची चिन्ह असून कडक कारवाई कारण्याची मागणी हुंदळेकर यांच्या कुटुंबियांनी केली तसेच संशयित चारचाकी वाहन ज्यांच्या नावाने आहे त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments