नेसरी प्रतिनिधी | संजय धनके : घटप्रभा नदीवरील तारेवाडी गावाजवळ असलेल्या जुन्या पुलालगतच नेसरी व परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन केले जात असतात, पण मुख्य रस्त्यापासून नदीपर्यंत व नदीपात्रात मोठ मोठे दगड असल्यामुळे गणेश भक्तांना विसर्जन करताना त्रास सहन करावा लागत होता.
लोकांची गैरसोय टाळावी यासाठी नेसरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पीएसआय रावसाहेब कसेकर व पोलीस कर्मचारी संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तारेवाडीचे उपसरपंच प्रशांत तुरटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून जेसीबीच्या साहाय्याने मुख्य रस्त्यापासून नदीपात्रापर्यंत मुरूम टाकत नदीपात्रातील दगड बाजूला केले.गणपती विसर्जन करताना भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून रस्ता बनवण्यात आला.त्यामुळे नेसरी व परिसरातील गणेश भक्तांकडून पोलीस प्रशासन व उपसरपंच तुरटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments