जागर काळभैरीचा लोककला महोत्सव उत्साहात संपन्न
गडहिंग्लज : ग्रामीण व शहरी भागात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव तसेच टीव्ही आणि मोबाईलच्या युगात जुन्या लोककला जपण्याचे आव्हान उभे राहिले आहे.अशा परिस्थितीत लोप पावत असलेल्या पारंपरिक लोककलेचा (शाहीरी, भजन, भारूड, गोधळ ) अदभूत अविष्कार अनुभवला कला व कलाकारांना जोपसणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून अश्या कलेचा जागर करून तळागाळातील लोककलाकारांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन करीत आहे असे प्रतिपादन गडहिंग्लज पंचायत समिती सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण यांनी केले.
गडहिंग्लज येथे आयोजित लोककला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गडहिंग्लजचे प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे,हजगोळी बुद्रुक च्या सरपंच सविता जाधव, नगरसेवक संतोष चिकोडे, उदय परीट,सरपंच संघटना आजरा महिला अध्यक्षा सुषमा पाटील,जि.प.सदस्य अमर चव्हाण,सोहाळेच्या सरपंच भारती डेळेकर,डॉ. पोवार फौंडेशनच्या संचालिका सरिता पोटे, जि. प.सदस्य अनिरुद्ध रेडेकर, संदीप पेडणेकर, अशोक सरदेसाई,श्रेया कोणकिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडहिंग्लज पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास परिषदेचे अध्यक्ष व डॉ. पोवार फौंडेशनचे संस्थापक डॉ. सचिन पोवार यांनी करून कलाकारांना नियम व वेळ यांची माहिती सांगितली.यावेळी विविध लोककलाकारांनी पोवाडे, गीते व पारंपरिक लोककला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तबला वादक, सुरपेटी वादक तसेच विविध प्रकारच्या लोककलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले.
जि.प.सदस्य अमर चव्हाण, प्र. नगराध्यक्ष महेश सलवादे,सरपंच संघटना महिला अध्यक्षा व लोकनियुक्त सरपंच कानोली सुषमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी लोककला टिकविण्यासाठी डॉ. पोवार फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. लोककला ही आपल्या संस्कृतीची ओळख असून तिच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवाजी होडगे, पिट्टू चोगुले, नितीन पाटील, हरीबा ससाने , किशोर नाईक, कवी श्रीपाल कांबळे,उत्तम तोगरले,सतीश नागरपोळे, चंद्रकांत इंगळे,माधुरी देसाई,शितल कुदळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. शाहीर रामदास सातपुते,सत्तापा कांबळे, शाहीर सुभाष तोदले,ज्येष्ठ शाहीर गुंडू राजाराम,ढोलकी पट्टू बायजी ससाणे,रवि राजाराम मास्तर,मारुती तोडकर, तानाजी पाटील, महादेव राजिगरे, तुकाराम गायकवाड, मनोहर कांबळे, जालिंदर डवरी, बाबू आजगेकर,सखुबाई राणे, महादेव पारळे,नारायण रावण, दत्तात्र गोधळी, हर्मोनियम वादक सतीश कांबळे, प्रतिक मोरे, आदींसह गडहिंग्लज, चंदगड, कागल सह कर्नाटकातील गौरी गीते, भजनी मंडळ, गोंधळी गीते व रेणुका जागर गीते, भारूड,डवरी,शाहीरासह परिसरातील विविध कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व कलाकारांना शील्ड व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात हनुमान नाटक मंडळ माद्याळ च्या अनोख्या गीत रामायनाणे वेशभूशेसह प्रात्यक्षिकाने सुरवात झाली.त्याबरोबरच रेणुका गीत, गोधळगीते, शाहिरी यासारखे कार्यक्रमातील सादरीकरणणे गडहिंग्लजसह बाजारास आलेले रसिक, प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले तर समारोप मुमेंवाडी येथील बाळूमामा भजनी मंडळ यांनी केला.सूत्रसंचालन लोककला महोत्सव समितीचे अध्यक्ष विठठल कदम यांनी केले तर कार्याध्यक्ष गणपती नागरपोळे यांनी आभार मानले.


Post a Comment
0 Comments