चंदगड प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत गावडे परिवारातर्फे जिल्हा परिषद विद्या मंदिर, बुजवडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन-पेन्सिल, कंपास पेटी आदी आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, तसेच त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने सहज उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
‘प्रत्येक दप्तर म्हणजे केवळ एक बॅग नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची सुरुवात आहे. प्रत्येक वही म्हणजे त्यांच्या भविष्याची कोरी पाने आहेत,’ या भावनेतून गावडे परिवाराने विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मिळालेला आधार हा या उपक्रमाचा खरा उद्देश ठरला. ‘तुम्ही फक्त शिका आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करा,’ असा संदेश देत गावडे परिवाराने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
यासाठी सदाशिव गावडे,सुरेश गावडे,बाळू गावडे,पावनोजी गावडे,संदीप गावडे,नामदेव गावडे, सतीश गावडे,संतोष गावडे,उत्तम गावडे,मोतीराम गावडे, सचिन गावडे,प्रमोद गावडे, मनीषा गावडे,भागेश पाटील,अनिल गावडे, सुनील गावडे,सुहास गावडे, विठ्ठल गावडे,निवृत्ती गावडे,जानबा गावडे,दत्तू गावडे, शामराव पाटील,केशव गावडे, बापू गावडे,कल्पना गावडे,मंगल गावडे, शोभा गावडे,महादेव गावडे, प्रतीक्षा गावडे,संचित गावडे यांच्यासह अनेक गावडे परिवारांचे सहकार्य लाभले.यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments