Type Here to Get Search Results !

पाटणे फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळावा


ऊस परिषदेसाठी प्रशांत अनुगडे फौडेशनच्या वतीने दहा हजार रुपये देणगी 



चंदगड : चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला. हुबळी येथे २९ ॲाक्टोंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रयत संघटनेच्यावतीने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 


यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रूपये दर पाहिजे असल्यास साखरेचा किमान हमीभाव ५० रूपये प्रतिकिलो गरजेचे आहे. यामुळे या आंदोलनास चंदगड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.तसेच राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेसाठी प्रशांत अनुगडे फौडेशनच्या वतीने दहा हजार रुपये देणगी देत प्रशांत अनुगडे यांनी पाठिंबा दिला व आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची भावना व्यक्त केली.यावेळी तालुक्यातील जेष्ठ नेतेमंडळी, शेतकरी नेते व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments