Type Here to Get Search Results !

यावल नगरपरिषदेचा 'बुलडोझर' फिरणार! ७ सप्टेंबरपासून महामोहीम




अतिक्रमणधारकांना शेवटचा अल्टिमेटम!रस्ते आणि गटारींवरील बेकायदेशीर बांधकामे पाडणार; खर्च आणि दंडही संबंधित व्यक्तीकडूनच वसूल करणार                           

यावल, जळगाव प्रतिनिधी| अमीर पटेल : शहरातील मुख्य रस्ते, वाहतुकीचे मार्ग आणि गटारींवर करण्यात आलेली अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी यावल नगरपरिषद आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. येत्या ७ सप्टेंबर २०२६ पासून शहरात व्यापक प्रमाणावर ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम राबवण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा नगरपरिषदेने एका जाहीर सूचनेद्वारे केली आहे. यामुळे बेकायदेशीर टपऱ्या आणि पक्की बांधकामे करणाऱ्या अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.


शहरातील चोपडा-फैजपूर रोड तसेच बुरूज येथून सातोद गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील सार्वजनिक जागा, गटारी आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणात टपऱ्या, हातगाड्या आणि पक्की अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे शहरात दररोज वाहतुकीची मोठी कोंडी होत असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत नगरपरिषदेने सर्व संबंधित दुकानदार, टपरीधारक आणि नागरिकांना आपली अतिक्रमणे स्वतःहून तात्काळ काढून घेण्याचे कडक आदेश दिले आहेत.एमआरटीपी (MRTP) कायद्यांतर्गत होणार गुन्हे दाखल७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या धडक मोहिमेत जी अतिक्रमणे नगरपरिषदेला स्वतः तोडावी लागतील, त्याचा येणारा सर्व खर्च, मजूर मजुरी आणि दंडाची रक्कम संबंधित अतिक्रमणधारकाकडूनच वसूल केली जाईल. एवढेच नव्हे तर, आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 'महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६' मधील कलम ५२, ५३ आणि ५४ अन्वये कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.


कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन"शहराच्या विकासासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ही मोहीम अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता, प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. असे आवाहन छाया अतुल पाटील (नगराध्यक्ष), सैदा बी. मोहम्मद याकुब (उपनगराध्यक्ष), निशिकांत गवई (मुख्याधिकारी, यावल नगरपरिषद) यांनी केले.

Post a Comment

0 Comments