चंदगड : शिक्षण हे मानव मुक्तीचे व समाज परिवर्तनाचे साधन आहे.विज्ञानाबरोबरच तत्त्वज्ञानातून माणूस घडत असतो म्हणून प्रांतवाद व प्रतिगामीवादी सामाजिक दृष्टिकोनातून शिक्षण मुक्त झाले पाहिजे असे मत र.भा.माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा.एस.व्ही.कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते चंदगड येथील न.भु.पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या 'शिक्षक दिन' कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य टी.एस.चांदेकर होते.स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थीनी प्रतिनिधी दिव्या ढेपे हिने केले तर पाहुणांचा परिचय सुनीता पाटील हिने करून दिला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, शिक्षण महर्षी डॉ.जे.पी.नाईक,माजी आमदार कै.न.भु.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना प्रा.एस.व्ही.कुलकर्णी यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती सांगताना म्हणाले की, जागतिक विचारवंत प्लेटो यांच्या कल्पनेतील तत्त्वज्ञ व राजकारणी म्हणून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनिय आहे. केवळ भौतिक प्रगती महत्वाची नसून नैतिक जीवनमूल्यंबरोबर शरीर, मन आणि बुद्धी यांचाही विकास झाला पाहिजे आणि हे फक्त शिक्षणातून घडते यावर त्यांचा जास्त विश्वास असल्याचे सांगितले. तसेच शिक्षणतज्ञ डॉ.जे.पी.नाईक व कै.न.भु.पाटील यांनी देखील शिक्षणाचा प्रसार, शेती, आरोग्य, नगररचना, स्वच्छता व शैक्षणिक धोरणात प्रभावी कामगिरी करून शिक्षण क्षेत्राला भरीव योगदान दिले असल्याचे सांगितले. उपप्राचार्य टी.एस.चांदेकर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची आहे याबद्दल सांगून शिक्षक दिनात सहभाग घेवून शिक्षक झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.ए.डी.धायगुडे यांच्यासह सर्व सदस्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. सुरुवातीला शिक्षक झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गामध्ये जाऊन अध्यापनाचे कार्य केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता त्यामुळे कॉलेज परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रा.एस.एम.निळकंठ प्रा.दीपक कांबळे, कु.खुशी गावडे, कु.आलीया शहा यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.ए.डी.धायगुडे, प्रा.एस.ए.शेख, प्रा.व्ही.बी.गावडे, प्रा.डी.व्ही.शिंदे, प्रा.एम.व्ही.बुरुड, प्रा.व्ही.व्ही.बोकडे, प्रा.आर.के.पाटील, प्रा.ई.जे.पाटील, प्रा.सौ.एस.एस.नेवगे,प्रा.के.व्ही. बांदिवडेकर, प्रा.सौ.एम.व्ही. गावडे, प्रा.वाय.आर.नाईक, प्रा.जयमाला कदम, युवराज भवारी, अविनाश पाटील यांच्यासह शालेय मंत्रिमंडळाचे सर्व प्रतिनिधी,बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. दूर्वा गावकर व सफा नाईकवाडी यांनी केले. आभार पूर्वा पाटील यांनी मानले.

Post a Comment
0 Comments