कोल्हापूर : चंदगड विधानसभा उपजिल्हा प्रमुख दिवाकर पाटील व शिवसेना चंदगड तालुका प्रमुख कल्लापा निवगीरे यांनी पदाधिकाऱ्यांसह शिवसेना पक्षाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव शिवसेना युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीमध्ये उपजिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख यांनी गेल्या साडेचार वर्षात आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत असताना जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठांकडून चंदगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्याचे खच्चीकरण कसे केले जाते? यावर सविस्तर भूमिका मांडली.कोल्हापूर शहर सोडलं तर ग्रामीण भागातील चंदगड तालुक्यात शिवसेना पक्ष मजबूत असतानाही राज्यपातळीतून ताकद न मिळाल्याने शिवसैनिकांना दाबले जाते.तालुक्यात सामाजिक समस्या, प्रश्न मांडत असताना वरिष्ठाकडून म्हणावं तसं पाठबळ मिळत नाही तसेच प्रकरण वरच्या पातळीवर गेले असता वरिष्ठ नेते दबाव टाकतात त्यामुळे याचा फटका जनतेमध्ये बसून पक्षाची हानी होते. त्यामुळे शिवसेनेची तालुक्यात मजबूत असताना पक्षाने ताकद दिल्यास चंदगड मतदारसंघात शिवसेनेचा आमदार होऊ शकतो, कारण कित्येक वर्षे या भागात शिवसेना पक्षाला मानणारा मोठा वर्ग असून पक्षांनी यावर वेळीच लक्ष देऊन कार्यकर्त्यांना बळ द्यावे,कोणाचा हस्तक्षेप न होता प्रश्नाना प्राधान्य मिळावे,शासकीय सुविधा व विकासनिधी द्यावा अश्या कित्येक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सध्या चंदगड मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी आहे अश्या खोट्या गोष्टी अफ़वा करून शिवसेना संपवण्याचं काम काही मंडळीकडून होतं आहे.शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना व आता जिल्ह्यातील पालकमंत्री शिवसेना पक्षाचे असताना चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी दिला व पदाधिकारी यांना किती ताकद दिली याचा पाढा पदाधिकाऱ्यांनी युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आला.यावेळी "चंदगड वर आमचे पुर्ण लक्ष आहे,त्यामुळे तुम्ही चिंता करू नका,तुम्हाला पुर्ण ताकद देण्यात येईल,तुम्ही आजपासून जोराने कामाला लागा,तिथे कामं करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही, मला संपर्क करा व कामाला लागा " असा विश्वास नेते श्रीकांत शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिला.
याप्रसंगी मनोहर पाटील,सलीम मुल्ला,अनिल भाऊ दळवी,संजय पाटील यासंह आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments