अवैध धंद्यांना लगाम घालणे नूतन पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यासमोर आव्हान,दारूची अवैध वाहतूक, गांजा तस्करीसह मटका-जुगारावर कारवाईची अपेक्षा
चंदगड प्रतिनिधी : चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान नूतन पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यासमोर आहे. अवैध मार्गाने होणारी दारू वाहतूक, गांजा व अमली पदार्थांची तस्करी, मटका-जुगार,खून,सरकारी व अन्य जमीन विकणारे दलाल यांचे रॅकेट वाढले असून यावर पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी वचक ठेवण्याचे काम केले पाहिजे.पण गेल्या दोन वर्षापासून प्रशासन यामध्ये कमी पडत असून याकाळात अनेक अधिकारी बदलून गेले पण चंदगडला मात्र नजर लागावी अशी बिहारसारखी वाईट प्रवुत्ती बदलू शकले नाहीत. त्यामुळे आताचे नूतन अधिकारी नामदेव शिंदे हे आव्हान कसे पेलणार? खाकी वचक कसा राहील यावर संपूर्ण जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
सीमावर्ती तालुका असल्याने कर्नाटक व गोवा राज्यातून होणाऱ्या दारूच्या अवैध वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.दोन्ही राज्याच्या सीमा लागून असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याना थारा मिळतो.हल्ली चोरी, मारामारी नंतर खुनाचे प्रमाणही तालुक्यात वाढत आहे.अमली पदार्थांची तस्करी रोखून तरुणाईला या विळख्यातून दूर ठेवणे, हेही पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान राहणार आहे.राजगोळी ड्रॅग्ज,गुडवळे महिला घातपात, पाटणे फाटा भागात चालणारा मटका जुगार, तिलारी भागातून होणारी अवैध दारू व चोऱ्या व खुनाचा वाढता आकार लक्षात घेता तालुक्यात कायदा सुव्यवस्था सुरळीत करणे काळाची गरज असून जिल्हा पोलीस प्रशासन, गृहमंत्रालय व सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
नूतन पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम राबविण्याची अपेक्षा नागरिकांकडून होतं असून कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याची कसोटी आता शिंदे यांच्यासमोर आहे.
नामदेव शिंदे (पोलीस निरीक्षक, चंदगड पोलीस ठाणे)


Post a Comment
0 Comments