चंदगड प्रतिनिधी : चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल, न. भू पाटील ज्युनिअर कॉलेज, व र.भा माडखोलकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य, डॉ. एस डी.गोरल यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी बोलताना डॉ.गोरल म्हणाले की, विविध जाती व धर्माच्या असलेल्या व विस्ताराने अतिशय मोठ्या असणाऱ्या आपल्या खंडप्राय देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या आदर्श संविधानामुळे देशाची एकता टिकून आहे. स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय सूत्रामुळे देशाची अखंडता अबाधित आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या एकात्मतेसाठी, राष्ट्रीय भावनेने कार्यरत राहून देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहनही त्यांनी बोलताना यावेळी केले. यावेळी मुख्याध्यापक, एन.डी देवळे, क्रीडा संचालक,प्रा. एस. एम. पाटील, क्रीडा शिक्षक खंडागळे, चिगरे, यांच्यासह बहुसंख्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments