(विविध मान्यवरांच्या हस्ते शिनोळी येथे काजू महोत्सवाचे उद्घाटन संपन्न)
रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : चंदगडी काजुला एक विशिष्ट चव असल्यामुळे या चविमुळे त्याचे जागतिक पेटंट करण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू असे आश्वासन आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिले. ते शिनोळी येथे आयोजित केलेल्या काजू महोत्सवा मध्ये उदघाटन प्रसंगी बोलत होते.
प्रा. दीपक पाटील यांनी प्रास्तविक मध्ये हा महोत्सव घेण्यामागील हेतू सांगितला.यावेळी आमदार पाटील म्हणाले,सरकारच्या माध्यमातून काजू उद्योगाला सहकार्य करून जीएसटी परतावा अडीच टक्यावरून पाच टक्क्यावर आणण्यासाठी पर्यंत करू तर काजू उत्पादक शेतकरी यांना जादा दर देण्यासाठी प्रयत्न करू असे माजी आमदार राजेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.तसेच देशी काजूच्या चिक्कीचा शालेय पोषण आहारात स्थान मिळावे अशी अपेक्षा राजेंद्र गड्ड्यानावर यांनी व्यक्त केली.चंदगडी काजुला चांगली बाजारपेठ मिळवून देऊ असे 'अपेडा'चे संचालक परशराम पाटील यांनी आश्वासन दिले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आत्याधुनिक मशीनरीच्या एक्स्पोचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाला असोसिएशनचे मोहन परब, नामदेव पाटील, अमित पाटील, धनंजय यादव, शांताराम पाटील, श्यामराव बेनके, राजेश पाटील आदिसह मान्यवर उपस्थित होते. अनिल शिवणगेकर यांनी सूत्रसंचालन केले.तर शाहू गावडे यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments