(एस.एस.हायस्कूल नेसरी प्रशालेने केले आयोजन)
संजय धनके/नेसरी प्रतिनिधी : दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून सर्वत्र 'कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने नेसरी येथील एस.एस हायस्कूलच्या वतीने कॉपीमुक्त जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असुन आज दिनांक 25 जाने 25 रोजी जनजागृती रॅलीमधे कॉपीमुक्त जनजागृतीचा नारा देण्यात आला.तसेच 'होणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेत मी कॉपी करणार नाही' अशी शपथ प्रशालेचे प्राचार्य एस,जे,कालकुंद्रीकर यांनी इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना दिली.दहावीच्या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा करण्याविषयी घोषणा देत सर्व नेसरी गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली.
Post a Comment
0 Comments