नेसरी/प्रतिनिधी : नेसरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी किरण हिडदुगी यांची १३ मतांनी निवड झाली असून विरोधी अर्ज दाखल केलेले रामचंद्र परीट यांना 2 मते पडले असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी सुरेश गुरव यांनी काम पाहिले.
डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच पदी गिरिजादेवी शिंदे या निवडून आल्या होत्या. त्यानंतर झालेल्या उपसरपंच निवडीत श्री. रवळनाथ नेसरीकर समविचारी आघाडी कडून उपसरपंच पदी प्रथमेश दळवी यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर समविचारी आघाडीत ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला संधी याप्रमाणे दोन वर्षांनंतर प्रथमेश दळवी यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या या पदासाठी गुरुवारी नेसरी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली.या प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गिरिजादेवी शिंदे तर ग्रामविकास अधिकारी सुरेश गुरव यांनी सचिव म्हणून काम पाहिले. ग्रामपंचायत कार्यालयात अकरा वाजता सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर रामचंद्र परीट, किरण हिडदुगी, यशवंत देसाई यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. माघारी नंतर यशवंत देसाई यांनी अर्ज माघार घेतल्याने परीट व हिडदुगी यांचे दोन अर्ज शिल्लक राहिल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक लागली. ही प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने पार पडली.
मतदान प्रक्रियेनंतर किरण हिडदुगी यांना १३ तर रामचंद्र परीट यांना २ मते पडून किरण हिडदुगी यांनी उपसरपंच पदी बाजी मारली. या प्रक्रियेवेळी ग्रामपंचायत सदस्या रुक्सार नुलकर या एकमेव गैरहजर राहिल्या. निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या वतीने हिडदुगी यांचा सत्कार करण्यात आला. तर कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
Post a Comment
0 Comments