गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज बस स्थानकावर दि.24 जाने 25 रोजी सायंकाळच्या सुमारास एका शाळकरी अल्पवयीन मुलीला छेडण्याचा संतापजनक प्रकार घडून आला.यातील संशयित आरोपीला नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गडहिंग्लज पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, या घटनेतील पीडित मुलगी गडहिंग्लज मधील एका प्राथमिक शाळेत शिकते.ती नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी बसस्थानकार आली असता संशयित आरोपी प्रवीण सुरेश देवार्डे (रा.धबधबा मार्ग ,गडहिंग्लज) याने त्या मुलीचा पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्या मुलीने हा प्रकार तेथील नागरिकांच्या लक्षात आणून देताच संशयिताला पकडून नागरिकांनी बेदम चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी संशयिताची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर ' पॉस्को 'अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास रमेश मोरे करत आहेत.
Post a Comment
0 Comments