Type Here to Get Search Results !

बेळगाव वेंगुर्ला रस्त्यालगत अज्ञात ईसमाचा मृत्यू.

चंदगड प्रतिनिधी : बेळगाव वेंगुर्ला रस्त्यालगत असणाऱ्या धावड समाजाच्या झोपडीत 50 ते 55 वयाच्या पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची वर्दी शिनोळीच्या पोलीस पाटील सुधा जत्ती यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. बेळगाव वेंगुर्ले राज्यमार्गालगत असणाऱ्या चंदगड तालुका शेतकरी सहकारी संघा नजीक धावड समाजाची झोपडी असून या झोपडीतून काही दिवसापासून दुर्गंधी सुटली होती. ही माहिती शनिवारी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी केली असता झोपडी मध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोंबे करत आहेत.




Post a Comment

0 Comments