Type Here to Get Search Results !

भाजपा नेते संग्रामसिंह कुपेकर यांच्याहस्ते साई इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ध्वजारोहण.

गडहिंग्लज प्रतिनिधी : साई एज्युकेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल (CBSE )व ज्युनिअर कॉलेज इंटरनॅशनल ऑफ नर्सिंग एमआयडीसी, गडहिंग्लज येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी ध्वजारोहण माजी बांधकाम व आरोग्य सभापती संग्रामसिंह कुपेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

गडहिंग्लज तालुक्यामध्ये इंग्रजी माध्यमातून गुणवत्ता, उत्तम दर्जाचे शिक्षण व संस्कार हे ज्युनिअर के जी ते दहावी व जुनिअर कॉलेज इथे दिले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून इमारतीची उभारणी केली गेलेली आहे तसेच मुलांना आवडेल असे अभ्यास वर्ग येथे केले गेलेले आहेत.तसेच एकंदरीत परिसर वर्ग इमारत अप्रतिम स्वच्छता ठेवलेली आहे.याबद्दल सतीश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक भाजपा नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी मनोगतामधे केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सतीश राव पाटील,संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरी, संस्थेचे संचालक तुषार पाटील जुनिअर कॉलेजचे प्राचार्य जावळी सर एन डी कांबळे बापूसाहेब देसाई यांच्यासह शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments