रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : सन 2024 मध्ये केलेल्या मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्ती यासंबंधी केलेल्या कार्याबद्दल कृषी सहाय्यक रत्नमाला अण्णासाहेब वाडेकर यांना आमदार शिवाजीराव पाटील यांच्याहस्ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यावेळी भरमु अण्णा पाटील,गोपाळराव पाटील,तहसिलदार राजेश चव्हाण यांच्यासह आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कृषी सहाय्यक वाडेकर यांनी नवीन मतदार नोंदणी, मतदानाबाबत जनजागृती केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.तसेच त्यांनी कोरोना काळातील कामगिरी,कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय जबाबदारी उत्कृष्ठरित्या निभावली आहे.सदर पुरस्कार मिळाल्याने कृषी सहाय्यक वाडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments