Type Here to Get Search Results !

बदलत्या काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व अधोरेखित : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

(डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट)

(प्रतिनिधी) - बदलत्या काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणखीनच अधोरेखित झाले आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

ज्येष्ठ संपादक आणि राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर नामदार आबिटकर यांची सदिच्छा भेट घेतली.त्यावेळी ते बोलत होते. संघटनेचे  जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांच्याहस्ते श्री.आबिटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सावंतवाडी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे निमंत्रणही त्यांना यावेळी देण्यात आले. अधिवेशनास उपस्थित राहणार असल्याचे नामदार आबिटकर यांनी आवर्जून सांगितले.



याप्रसंगी संघटनेचे राज्य सचिव तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख  राजा मकोटे, सहसचिव इंद्रजीत मराठे, कोल्हापूर शहर उपाध्यक्ष विजय यशपुत्त, इचलकरंजी महानगर अध्यक्ष सॅम संजापुरे, इचलकरंजी संपर्कप्रमुख सचिन बेलेकर, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राजू म्हेत्रे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. सायली मराठे, उपाध्यक्षा सौ. अंजुम मुल्ला, सचिव सौ. संगीता हुग्गे, प्रभावती बेडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments