Type Here to Get Search Results !

आज चंदगड शहरात शिवशक्ती स्थळाचा वर्धापनदिन सोहळा.

रुपेश मऱ्यापगोळ/ चंदगड प्रतिनिधी : चंदगड शहर व परिसरातील शिवभक्तांचे आकर्षण असलेल्या शिवशक्ती स्थळाचा तिथीनुसार दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी पहिला वर्धापन दिन साजरा केला जाणार असून या निमित्त विविध कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन केले असून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.      


मंगळवार दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद वाटप असा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर सायंकाळी ठीक ७ वाजता कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या गडकोट मोहीम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श चरित्रावरती श्री समर्थ सेवा ट्रस्ट समर्थ नगर भडगाव तालुका गडहिंग्लज येथील उत्तराधिकारी स. भ. शरद बुवा रामदासी यांचे व्याख्यान आयोजित केले असून या व्याख्यानाचा शिवप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकामार्फत केले आहे.





Post a Comment

0 Comments