Type Here to Get Search Results !

नांदवडे येथे 'संत्या कुली' आत्मकथन प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

चंदगड प्रतिनिधी : ॲड.संतोष मळवीकर लिखित “संत्या कुली” आत्मकथन प्रकाशन सोहळा चंदगड येथील नांदवडे या ठिकाणी उत्साहात पार पडला.जेष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. राजन गवस व ईतर मान्यवरांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी मानसिंगराव खोराटे,संग्रामसिंह कुपेकर,प्रा.सुनील शिंत्रे सर,विद्याधर गुरबे,नागेश चौगले,विलासराव पाटील,डॉ नंदकुमार मोरे,पै.विष्णू जोशीलकर,आर.आय पाटील, नांदवडे गावचे सरपंच राजेंद्र कांबळे यांच्या व ॲड.संतोष मळवीकर यांच्यावर प्रेम करणारे सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील सर्व शिक्षित व्यक्ती, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 “संत्या कुली”
ही आत्मकथा आहे एका साहसी तरुणाची, ज्याने आपल्या आयुष्याच्या प्रवासाला विमानतळावरील हमालीच्या कामापासून सुरुवात केली. केवळ मातृभूमीचं प्रेम, सामाजिक न्यायासाठीची लढाऊ वृत्ती, आणि विचारांची स्पष्टता यांच्या जोरावर तो प्रगतीपथावर येत वकील आणि सामाजिक कार्यकर्ता बनला,या व्यक्तिमत्त्वाच नाव आहे-ॲड.संतोष मळवीकर !




Post a Comment

0 Comments