Type Here to Get Search Results !

विविध मागण्या संदर्भात कलाकार महासंघाकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा.

मुंबई प्रतिनिधी : मुंबई येथे सेंट्रल परिवहन महामंडळाच्या कार्यालयात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची 'कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे' यांनी भेट घेतली.भेटी दरम्यान महाराष्ट्रातील बॅन्ड बॅन्जो  कलाकार मालक यांना येणार्‍या अडचणी विषयी चर्चा करत निवेदन दिले.तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या द्वारे हा विषय मार्गी लावून महाराष्ट्रातील बॅन्ड बॅन्जो कलाकार व मालक यांना न्याय देण्याची विनंती केली.

महाराष्ट्र राज्यातील बॅन्ड बॅन्जो कलाकारांच्या माॅडीफाय गाड्या यांना आर. टी. ओ. मार्फत शुल्क भरून रितसर परवानगी मिळावी.राज्यातील बॅन्ड बॅन्जो कलाकारांना लोककलेचा दर्जा मिळावा,महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे अशी विनंती केली.यावेळी प्रताप सरनाईक यांनी आश्वासन देत सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष बबन पवार, पन्हाळा तालुका अध्यक्ष कृष्णात निकम, पन्हाळा तालुका संपर्क प्रमुख प्रविण जाधव हे उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments