चंदगड प्रतिनिधी : ग्रुप ग्रामपंचायत उमगाव-न्हावेली आणि नवचैतन्य बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वा वित्त आयोगा अंतर्गत महिलांच्या कौशल्य वृद्धीसाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे विविध मसाले तयार करायचे प्रशिक्षण देण्यात आले.
सदर कार्यक्रमाला सरपंच राधा सावंत,सदस्य विद्या गावडे,ग्रामसेविका एस. यल. जाधव,ऋतूजा गावडे,प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गावडे,परशराम देवळी,अवदुंबर देवणे,दिपक गावडे तसेंच महिला बचत गट अध्यक्ष, सदस्य तसेंच इतर महिला उपस्थित होत्या.प्रशिक्षक सीमा कोळवले व संस्था प्रतिनिधी रविंद्र टक्केकर,कृष्णा पाटील यांनी सर्वाना सविस्तर माहिती महिला वर्गाला दिली.यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला.
Post a Comment
0 Comments