चंदगड प्रतिनिधी : सुरुते गावचे सुपुत्र व मराठा बँक बेळगावचे चेअरमन यांनी सुरुते शाळेला कपाट,दोन ग्रंथालय कपाट व पाणी बाॅटल असे ५२ हजार रु.चे उपयुक्त साहित्य शाळेला भेट म्हणून दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भरमू आपटेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मारुती पाटील व सोसायटीचे चेअरमन नारायण पाटील उपस्थित होते.यावेळी पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसगी ग्रामपंचायत सदस्य नारायण चोपडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबू चौगुले, सोसायटीचे सदस्य दत्तू पवार,यल्लापा पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अवधूत भुजबळ,शिक्षणतज्ज्ञ भरमू चौगुले,दिपक पाटील,मारुती खणगावकर,पालक नागनाथ पवार,अजित बोंगाळे,रामलिंग भाटे,भरमू शिंदे,मुख्याध्यापक परशराम नाईक, शिवाजी रामणकटटी,शशिकांत सुतार,तानाजी नाईक,कल्लापा एकणेकर,रमेश नाईक,रेणुका सुतार हे सर्व शिक्षक उपस्थित होते.याकामी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सुतार यांनी केले.व आभार तानाजी नाईक यांनी मानले.
Post a Comment
0 Comments