नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : नेसरी गावातील लाकूड व्यापारी बाळू दत्तात्रय पाटील यांची कन्या पूजा बाळू पाटील यांनी 26 जानेवारीचे औचित्य साधून हडपसर पोलीस स्टेशन पुणे येथे रांगोळी रेखाटून आपली कला सादर केली.पूजाने नुकतच डॉक्टरेट ही उच्च पदवी घेऊन पुण्यात चांगल्या पोस्टवर काम करत असताना स्वतःची कलाही जपली आहे.
याआधी 15 ऑगस्टला कात्रज पोलिस ठाण्यात रांगोळी काढली होती.तिथूनच प्रेरणा घेत सर्वत्र पोलीस स्टेशन मधून रांगोळीसाठी स्वतः कॉल करून बोलून घेतल जात आहे.तिला सर्व पोलीस अधिकारी वर्गाकडून कौतुकाची थाप दिली जात आहे.
Post a Comment
0 Comments