रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथजी शिंदे त्यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मजरे कार्वे येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात रक्तदान शिबिर पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात देवगोंडा पोवार यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पूजनाने झाली.प्रास्ताविकामधे संचालक अनिल होनगेकर यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागे असलेला हेतू स्पष्ट करून रक्तदान हे पवित्र असे दान असल्याचे सांगितले.तर शिबिरात एकूण 76 बॅग रक्त संकलन करण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शहापूरकर, उपाध्यक्ष वंदना पाटील यांनी रक्तदान केल्यानंतर होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे व संजीवन ब्लड बँक कोल्हापूर यांचे विशेष आभार देखील मानले.या कार्यक्रमाला संचालक विजय कलखांबकर,मिलिंद पाटील,नितीन पवार,धर्मेंद्र पटेल तसेच महादेवराव वांद्र कॉलेज स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.असोसिएशनचे खजिनदार विनायक गवसेकर यांनी आभार मानले.या रक्तदान शिबिराला मदन भाऊ पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
Post a Comment
0 Comments