कविता मऱ्यापगोळ/गडहिंग्लज प्रतिनिधी : हलकर्णी ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत 2024- 25 सालातील एकूण 59 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी हलकर्णी ग्रामपंचायत सरपंच योगिता संगाज, ग्रामपंचायत सदस्य अविनाश दूध्यागोळ, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके, बापू वाजंत्री यांच्याहस्ते मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लिपिक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments