Type Here to Get Search Results !

तारेवाडीत घरकुल मंजुरी पत्र वितरण.

नेसरी प्रतिनिधी- संजय धनके : तारेवाडी येथे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना अंतर्गत 2024 -25 वर्षातील 40 लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीमार्फत ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य गोपाळ विठोबा देसाई, सरपंच विश्रांती नाईक व उपसरपंच प्रशांत तुरटे यांच्याहस्ते मंजुरी पत्र वितरण करण्यात आले.लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रक्षेपण लाभार्थी व ग्रामस्थांना दाखविण्यात आले.

यावेळी सरपंच विश्रांती नाईक,उपसरपंच प्रशांत तुरटे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य गोपाळ देसाई, युवराज पाटील, वनिता पाळेकर, सुरेखा गुरव, व ग्राम विस्तार अधिकारी बी.एम.पाटील,ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी,लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments