कविता मऱ्यापगोळ / गडहिंग्लज प्रतिनिधी : आपल्या कसदार अभिनयाने मराठी मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी या रविवार दिनांक 2 मार्च रोजी महागाव तालुका गडहिंग्लज येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे.
यावर्षी एक्सप्लोर 2025 अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवून कौशल्याची चाचणी केली जाणार असून यातच मिस्टर व मिस एस.जि. एम.ठरणार आहे.विजेत्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना पर्यावरण रक्षक पूरक असे ई-बाईक देऊन गौरव करण्यात येणार आहे. याच्या अंतिम फेरीचे निरीक्षण अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या निरीक्षणात होणार असून ते विजेता घोषित करणार असून कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांशी हितगुज साधतील. हा कार्यक्रम फक्त शिक्षण समूहातील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी व निमंत्रित पाहुण्यांसाठी असून त्यासाठी भव्य व आकर्षक सेट उभारणी करण्यात आले आहे.यानंतर डीजे नाईट हा कार्यक्रम होणार आहे.




Post a Comment
0 Comments