Type Here to Get Search Results !

नेसरी येथे युवकाचा खून, एकास अटक.

रुपेश मऱ्यापगोळ/चंदगड प्रतिनिधी : मद्यप्राशन करून शिवीगाळ करत असल्याचा राग मनात धरून अशोक जामुने (वय 36,रा.मातंग समाज गल्ली,) या युवकाचा खून केल्याप्रकरणी अरमान मलिकजान बागवान (वय 28,रा.रविवार पेठ नेसरी) या युवकास अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील अधिक माहिती अशी गडहिंग्लज - नेसरी रोडवरील साखरे मंगल कार्यालाजवळ अशोक जामूने हा रक्ताच्या थारोळ्यात बुधवारी सकाळी पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले,नेसरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे,चंदगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला, व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला.घटनास्थळा जवळील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अशोक जामूने हा घरी चालत जात असताना दिसले.त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीने पाठीमागून लाथ मारली.यामुळे तो रस्त्यावर पडला व उठून पुन्हा चालू लागला. तो जात असताना त्याच्या मागोमाग संशयित व्यक्ती जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले. पुन्हा त्याने अशोकला लाथा मारल्या.यामध्ये अशोक जामूने हा खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अति रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मृत झाला असा अंदाज आहे.

सदर घटनेनंतर आरमान हा निघून गेला.बुधवारी सकाळी याची चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी संशयित अरमान बागवान याला घरातून ताब्यात घेतले व अधिक चौकशी केली असता अशोक  हा दारू पिऊन शिवीगाळ करत असल्याचे राग मनात धरून अशोकला मारल्याचे सांगितले.या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे करत आहेत.





Post a Comment

0 Comments