पुणे प्रतिनिधी : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले.
पुण्यात कोथरुड येथील आय टी इंजिनिअरला मारहाण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यानंतर पुणेकरांच्याही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अखेर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यानंतर गजा मारणे व रुपेश मारणे यांना त्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी केले.त्यानंतर गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले.पोलिसांनी त्यांना अटक दाखवत कारवाई सुरु केली आहे.
गजा मारणे व त्याच्या टोळीतील २७ जणांवर कारवाई करणार, त्यांची मालमत्ता जप्तीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज वार्तालाप कार्यक्रमात दिली होती. त्यानंतर काही तासात गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याच्याविरुद्ध १९८८ पासून एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोनदा तडीपाराची कारवाई करण्यात आली असून एकदा स्थानबद्ध केले आहे. अशा प्रकारे त्याच्यावर १२ वेळा वेगवेगळी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
Post a Comment
0 Comments