Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरात वृद्धेचा खून,एकास अटक.

कविता मऱ्यापगोळ/गडहिंग्लज प्रतिनिधी : शनिवार दि.22 फेब्रु 24 रोजी,शोभा सदाशिव धनवडे या वृद्धेचा अज्ञाताने खून करून अंगावरील दागिने पळविले होते.या प्रकरणाचा गडहिंग्लज पोलिसांनी तपास करत अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.गुरुनाथ उर्फ पिंटू चौगुले (रा.हट्टी,बसवाना मंदिराजवळ)असे खून करणाऱ्याचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.  

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि,कचरा डेपो लगत असणाऱ्या नेहरूनगर येथील शोभा धनवडे या शनिवारी संध्याकाळी पासून बेपत्ता झाल्या होत्या.त्यांना एका अज्ञात व्यक्तीने गाडीवरून घेऊन जात असताना काहींनी पाहिले होते.यादरम्यान शोभा धनवडे यांचा शोधाशोध केला असता त्यांचा मृतदेह मेटाच्या मार्गावरील विहिरीतील झाडाझुडपात आढळला होता.यावेळी मृतदेहाच्या अंगावरील असणारे अकरा तोळे सोने गायब झाले होते.लुटमारीच्या हेतूने हा खून झाला असा कयास धरून  पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली.पण गाडीवरून घेऊन जाणारा हा इसम कोण? हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला होता. 

यादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत पिंटू चौगुले याचे नाव समोर आले.त्याला ताब्यात घेतला असता त्याने खुनाची कबुली दिली.पिंटू चौगुले याने शोभा धनवडे यांच्याकडून दहा हजार रुपये हात उसने घेतले होते.ते उसने पैसे शोभा धनवडे यांनी पिंटूकडे वारंवार मागितल्याने रागाच्या भरात शोभा धनवडे  यांना घरी चला पैसे देतो असे सांगून गाडीवरून घेऊन गेला होता.त्यांनतर त्यांना घटनास्थळी नेवून पाठीमागून दोरीने गळा आवळून पिंटू चौगुले याने शोभा यांचा खून केला.व अंगावरील 11 तोळे दागिने काढून घेऊन त्यांचा मृतदेह रातभर ओमनी गाडीत ठेवून रविवारी सकाळी हे मृतदेह अशोक आजरी यांच्या शेतातील विहिरीजवळ टाकण्यात आला.याप्रकरणी संशयिताने वापरलेले मोटरसायकल व ओमनी कार पोलिसांनी जप्त केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र  कळमकर, गडहिंग्लजचे  पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने केला.






Post a Comment

0 Comments