कविता मऱ्यापगोळ/गडहिंग्लज प्रतिनिधी : गडहिंग्लज शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भडगाव पुलानजीक गीता रामाप्पा केसरकर वय (14 ) हिने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.गीता ही रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता घरातून निघून गेली होती.सदरची मुलगी ही इयत्ता नववी मध्ये शिकत होती.सदर मुलीच्या बॅगेमध्ये काही रोख रक्कम तसेच जिल्ह्याच्या ठिकाणाहून आलेले बसचे तिकीट सापडले.पण सध्यातरी त्या शाळकरी मुलीने जीव का गमावला? कोणतं कारण या मुलीच्या जिव्हारी लागलं?या प्रकरणात अजून कोणी व्यक्ती असू शकते का? अश्या अनेक गोष्टीचा उलगडा पोलिसांच्या तपासातून पुढ येऊ शकतो.
आज सकाळी गीताचा मृतदेह करंजीच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला.या शाळकरी मुलीने रविवारी रात्रीच्या सुमारास गळफास लावून घेतल्याची शक्यता वर्तवली जात असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुतार हे करत आहेत.
Post a Comment
0 Comments