Type Here to Get Search Results !

महादेवराव इन्स्टिट्यूटकडून वार्षिक स्नेहसंमेलन, गौरव व सत्कारसोहळा कार्यक्रम संपन्न.

विद्यार्थीच खरे देशाचे संसाधन आहेत-अजित पाटील 

अमोल कांबळे/चंदगड प्रतिनिधी : महादेवराव वांद्रे इन्स्टीटयूट ऑफ टेक्नोलॉजी, तुर्केवाडी व महादेवराव बी.एड.कॉलेज तुर्केवाडी यांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२५ संपन्न झाला. या कार्याक्रमासाठी प्रमुख पाहुणे अजित पाटील (भारताचे महिला हॉलबॉल संघ प्रशिक्षक) हे होते, तर अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष महादेवराव वांद्रे हे होते. 

प्रत्येक विद्यार्थी खेळाडू होऊ शकत नाही.पण प्रत्येकाने आपल्या क्षमता व कौश्यल्य जाणून घेऊन विविध क्षेत्रात आपला विकास साधावा व ग्रामीण भागातील युवकांना खेळामध्ये आपले करिअर करण्याची उत्तम संधी आहे. मात्र ते आपल्याच कतृत्वाने सिद्ध करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल.त्याच बरोबर वाचनाचा व्यासंग वाढवला पाहिजे. त्याचा प्रमाणे आपल्या महाविद्यालायातील सुविधांचा लाभ घेतला पाहिजे कारण विद्यार्थीच खरे देशाचे संसाधन आहेत असे मार्गदर्शन  अजित पाटील यांनी विध्यार्थ्यांना केले.

विश्वनाथ पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.ते म्हणाले,जीवन खूप सुंदर आहे ते सुंदररित्या जगता आले पाहिजे.संस्कारशील पिढीची आज देशाला गरज आहे. या शैक्षणिक  संकुलातील प्रत्येक घटकाने यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रा. आर. बी. गावडे ( उप प्राचार्य वाय. सी. कॉलेज हलकर्णी ) विश्वनाथ पाटील,पी.एस.आय. सुहास शिंदे यांचा त्यांच्या क्षेत्रातील कार्याबद्दल संस्थेकडून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते फार्मसी, पोलीटेक्निक, बी.एड. विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचाही संस्थेकडून गौरव करण्यात आला. 

विध्यार्थ्याच्या विविध कलागुणांना वाव देणेसाठी वार्षिक स्नेह्संमेलन सोहळा पार पडला. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन विश्वास पाटील पोलीस निरीक्षक चंदगड यांचेहस्ते झाले.या कार्यक्रमावेळी मोहन परब, उमर पाटील,  मृणालिनी वांद्रे, प्रा. बी. एच. चौगुले, स्वप्ना देशपांडे, मोनाली परब,प्रा. उत्तम पाटील, प्रा. सुधीर लंगरे, प्रा. एस. पी. गावडे, प्रा. अमेय वांद्रे, श्वेता पोटे, स्वप्नील सुतार, प्रा. सागर पाटील, प्रा. प्रियांका कदम, प्रा. विनायक यादव सर्व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक प्रमुख प्रा. प्रधान ग. गो. यांनी प्रास्ताविक केले, तर पाहुण्यांची ओळख व आभार प्रा. एन. जे. कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी प्रियांका हरकारे व भक्ती देसाई यांनी केले.





Post a Comment

0 Comments