नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार : बसर्गे तालुका गडहिंग्लज येथील शहीद जवान प्रशांत शिवाजी जाधव यांच्या कुटुंबाने आपल्या घरातच शहीद जवान यांचा पुतळ्याचे आजी माजी सैनिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बसवत अनावरण केले.यावेळी गडहिंग्लज,बेळगाव,बसर्गे येथील सेवानिवृत्त जवान उपस्थिती होते.
प्रा.डॉ.गोपाळ गावडे,माजी सैनिक शशिकांत जाधव यांनी मनोगते व्यक्त केले. तर विर पत्नी पद्मा जाधव, वीर माता सौ.रेणुका,वीर कन्या कू.नियती,वीर पिता शिवाजी जाधव,वीर आजी श्रीमती कमळाबाई जाधव,नायब सुभेदार दयानंद घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments