भरमु शिंदे/चंदगड प्रतिनिधी : हाजगोळी - धामणे येथे रस्त्यावर गेली दहा ते पंधरा दिवस हत्तीने धुमाकूळ घातलेला आहे. येणा- जाणाऱ्या वाहनावर धावून जात असून वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होऊन लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय की काय असे दिसून येत आहे.
हाजगोळी व धामणे या गावच्या लोकांना कामानिमित्त एकमेका गावात जाण्यासाठी प्रवास करणे गरजेचे असते.पण या ठीकाणाहून प्रवास करणे खूप हलाक्याचे झाले असून वनखात्याने याकडे लक्ष दिले देऊन हत्तीचा बंदोबस्त करावा.हत्तीने घातलेल्या हौदोसमुळे येथील नागरिक भयभीत वातावरणात जगत आहेत.त्यामुळे लोकांच्यावर कधीही संकट ओढवले जाऊ शकते.शिवाय शेताशिवारात शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.त्यामुळे येथील वनविभाग लोकांचा अंत पाहते की काय?जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून केला जात असून नागरिकांतून संतापाची लाट दिसून येत आहे. एकंदरीत वनखात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व नागरिकांकडून होत आहे.
Post a Comment
0 Comments