Type Here to Get Search Results !

आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीचं रिकाम्या राहत नाहीत-संदीप धम्म्मरक्षित

कोल्हापूर प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत अंतिवडे ता. भुदरगड जि.कोल्हापूर येथील ग्रामपंचायत सदस्या संज्योत संदीप धम्म्मरक्षित यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने वि. मं. अंतिवडे, अंतिवडे हायस्कुल अंतिवडे व सौ. संज्योत धम्मरक्षित त्यांच्या अंतिवडे येथील संपर्क कार्यालयात बाजार पिशव्यांचे वाटप आणि वि. मं. अंतिवडे शाळेस खुर्च्या देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

आनंद वाटणाऱ्या ओंजळी रिकाम्या कधीचं राहित नाहीत.निसर्ग त्या ओंजळी पुन्हा भरभरून देतो याची जाणीव झाली,असे मत माणूस फाउंडेशन संस्थापक संदीप धम्म्मरक्षित यांनी मांडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शामरावदादा वाघमारे होते.यावेळी अंतिवडे हायस्कुलचे मुख्याध्यापक वसंत मोरे,सहाय्यक शिक्षक केशव डाकरे,मोहनदादा फगरे यांच्याहस्ते वि. मं. अंतिवडे शाळेचे मुख्याध्यापक सुनील हेगडे,सहाय्यक शिक्षक स्वप्नील कांबळे,अविनाश खामकर यांच्याकडे प्लास्टिक खुर्च्या सुपूर्द करण्यात आल्या.


यावेळी अंगणवाडी शिक्षिका सुजाता परुळेकर,आशा स्वयंसेविका दीपाताई हावलदार,अरुण कांबळे, बाळकृष्ण सुतार अविष्कार कांबळे, दिनकर वाघमारे, मनोजदादा कांबळे यांच्यासह वि. मं. अंतिवडे तसेच अंतिवडे हायस्कूल अंतिवडेचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्व कामी युवा नेते रवींद्र वाघमारे,गोपाळकृष्ण कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

      



Post a Comment

0 Comments